Iyatta 9vi Vishay Marathi Aadarshavadi Mulgavkar swadhyay | इयत्ता ९वी मराठी आदर्शवादी मुळगावकर स्वाध्याय
प्र.1 योग्य उदाहरण लिहा.
अ)
प्र.2. आकृती पूर्ण करा.
प्र.3. खाली काही उदाहरणे दिली आहेत. या उदाहरणांवरून मुळगावकरांच्या व्यक्तीमात्वाचे तुम्हाला जाणवलेले पैलू लिहा.
प्र. ४. वैशिष्ट्ये लिहा.
(अ) लंडन येथील स्थापत्य विषयाची पदवी-
उत्तर: लंडनच्या
पदवी परीक्षेच्या अभ्यासक्रमात पुस्तकी शिक्षण होतेच, शिवाय, प्रत्यक्ष कारखान्यात
काम करावे लागे, मगच पदवी मिळत असे.
(आ) टेल्कोचा पुण्यातील कारखाना-
उत्तर: उत्पादन
व व्यवस्थापन या दोन्ही द्रुश्तिन्नी कारखाना पहिल्या दर्जाचा आहे, हा लौकिक
मिळाला.
(इ) टेल्कोची परंपरा-
उत्तर:सर्व
दर्जाचे व्यवस्थापक कारखान्यात रोज फेरी मारत असत, ही टेल्कोची परंपरा होती.
(ई) टेल्कोची मालमोटार-
उत्तर:टेल्कोची
मालमोटार पहिल्या दर्जाची बनली व त्यात सतत सुधारणा होत गेली.
आदर्शवादी मुळगावकर स्वाध्याय प्रश्न उत्तरे| आदर्शवादी मुळगावकर मराठी स्वाध्याय ९वी
इयत्ता नववी मराठी स्वाध्याय आदर्शवादी मुळगावकर | इयत्ता नववी मराठी pdf कुमारभारती
प्र. ५. खालील
वाक्यांतील अधोरेखित शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहून, अर्थ न बदलता वाक्य पुन्हा लिहा.
(अ) मुळगावकर अबोल प्रवृत्तीचे होते.
उत्तर:
मुळगावकर बोलक्या प्रवृत्तीचे नव्हते.
(आ) मुळगावकर पदवी घेऊन आले, तेव्हा भारतात मंदीची
लाट होती.
उत्तर:
मुळगावकर पदवी घेऊन आले, तेव्हा भारतात भरभराटीची लाट नव्हती.
(इ) मुळगावकरांचे जीवन असमाधानी नव्हते.
उत्तर:
मुळगावकरांचे जीवन समाधानी होते.
प्र. ६. अधोरेखित केलेल्या अर्थाचा वाक्प्रचार पाठातून शोधून लिहा.
(अ) यशने प्रकृतीकडे दुर्लक्ष केल्यामुळे यश वारंवार आजारी
पडत होता.
उत्तर:यशने
आहाराची हेळसांड केल्यामुळे तो वारंवार आजारी पडत होता.
(आ) शेतीत खूप कष्ट केल्यामुळे यावर्षी रामरावांच्या कष्टाला
चांगले फळ मिळाले.
उत्तर:शेतीत
खूप राबल्यामुळे यावर्षी
रामरावांच्या कष्टाला चांगले फळ मिळाले.
(इ) आवाक्याबाहेरचे काम समीरने सन्मार्गाने पूर्ण केले.
उत्तर:आटोक्यात
नसलेले काम समीरने सन्मार्गाने पूर्ण केले.
(ई) स्वतःच्या तत्त्वांशी समझोता करणे योग्य नव्हे.
उत्तर:स्वतःच्या
तत्वाशी तडजोड करणे योग्य नव्हे.
प्र. ७. स्वमत.
(अ) पाठात उल्लेख असलेल्या चिनी म्हणीतील विचार तुमच्या शब्दांत स्पष्ट
करा.
उत्तर:
माणूस आपल्या
भविष्याची तयारी अगोदरच करून ठेवतो. ही तयारी विविध प्रकारांची असते. आर्थिक
स्वरूपातील मदत फक्त काही प्रमाणातच उपयुक्त असते. झाडे लावली, तर दरवर्षी
फळाफुलांचे उत्पन्न मिळते. तसेच लाकडांची निर्मितीही होते. पण, कोणत्या झाडांचा
कधी, कस व किती फायदा घ्यायचा, हे माणूसच ठरवतो. म्हणून माणूस चांगला असेल, तर या
गोष्टीचा फायदा त्याला स्वतःला होतोच, शिवाय त्याच्या कुटुंबालाही होतो. जर
व्यक्ती अत्यंत कार्यक्षम असेल तर त्याचा लाभ संपूर्ण समाजाला होऊ शकतो. म्हणून,
पैसे जमा करण्यापेक्षा झाडे लावणे अधिक उत्तम आहे, कारण त्यांचा मान्सासना उपयोग
होणारच, परंतु, त्याहून अधिक फायदेशीर म्हणजे माणसांना घडवणे, याचा आपल्याला खूप
उपयोग होतो. म्हणजे मनसे तयार करणे, हा मानवी समाज घडवण्याचा मार्ग आहे. चीनी म्हणीमध्ये नेमके हेच सांगितले
आहे.
9th class marathi question and answer pdf download
9th std marathi digest pdf navneet
Aadarshavadi Mulgavkar class marathi question and answer sthaulvachan
(आ) टेल्कोच्या मालमोटारीच्या ड्रायव्हरशी संवाद साधण्यामागे मुळगावकरांचे
कोणते हेतू असावेत, असे तुम्हांस वाटते ?
उत्तर:
एका
मालमोटारीचा चालक देशभरात विविध ठिकाणी प्रवास करतो, कधी जंगलातून प्रवास करतो, तर
कधी वाळवंटी परदेशातून तो अत्यंत थाड प्रदेशातून आणि जोरदार पाउस पडणाऱ्या
प्रदेशातूनही जातो. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या परिसरांतील वातावरणात आपली मालमोटार
कशी चालत असेल ? काही अडचणी निर्माण होत असतील का ? मोटारीच्या स्वरुपात उणीवा
राहिल्या असतील क ? अशा प्रश्नांची उत्तरे ड्रायव्हर लोकांशी केलेल्या संवादातून
मिळतात. जर गाडीत काही कमतरता असेल तर त्यावर उपाय करणे शक्य असते. असे करून
मोटारीला अधिक परिपूर्ण बनवण्याची संधी मिळते.
**********