Iyatta 9vi Vishay Marathi Vanvasi swadhyay | इयत्ता ९वी मराठी वनवासी स्वाध्याय
प्र. १. खालील शब्दसमूहांतील अर्थ स्पष्ट करा.
(१) पांघरू
आभाळ-
उत्तर: उघड्यावर संसार आहे.
(२) वांदार
नळीचे-
उत्तर: डोंगराच्या
घळीत वानरे असतात,तिथे वास्तव्य.
(३) आभाळ
पेलीत-
उत्तर: ऊन,
वारा, पाऊस यांचा सामना करीत
इयत्ता 9vi मराठी गाईड २०२५ pdf | इयत्ता नववी मराठी गाईड pdf
वनवासी मराठी स्वाध्याय ९वी | इयत्ता नववी मराठी स्वाध्याय वनवासी
प्र. २. शोध घ्या.
(अ) 'हात लाऊन गंगना येऊ चांदण्या घेऊन' या काव्यपंक्तीत व्यक्त
होणारा आदिवासींचा गुण-
उत्तर: अतुलनीय
धैर्य व उत्तुंग इच्छाशक्ती.
(आ) कवितेच्या
यमकरचनेतील वेगळेपण-
उत्तर: प्रत्येक
कडव्यातील चार पंक्तीमधील पहिल्या, दुसऱ्या व चौथ्या पंक्तीचे यमक जुळते. उदा.
भाकर-भोकर-ढेकर .
वेगानं-यंगून-घेऊन.
प्र. ३. काव्यसौंदर्य.
(१) 'बसू सूर्याचं रुसून पहू चंद्राकं हसून', या
काव्यपंक्तीतील भावसौंदर्य स्पष्ट करा.
उत्तर:
दुपारी सूर्य
तापतो. माळरानावर हुंदडणाऱ्या आदिवासी मुलांना कडक उन्हात खेळावे लागते.
उघड्याबोडक्या असलेल्या मुलांना या उन्हाचा त्रास होतो, म्हणून ते सूर्यावर रुसून बसतात. रात्री चंद्र उगवतो. त्या शीतल
चंद्रप्रकाशात आदिवासी मुलांच्या बागडण्याला उधाण येते, म्हणून
चंद्राकड़े बघून ते आनंदाने हसतात. सूर्यचंद्राचे त्यांच्याशी असलेले अनोखे नाते
या ओळींतून प्रकट झाले आहे.
(२) 'डोई आभाळ पेलीत चालू शिंव्हाच्या चालीत', या
पंक्तीतील कवीला अभिप्रेत असलेला अर्थ सांगा.
उत्तर:
आदिवासी मुले उघड्याबोडक्या अंगाने उंबराच्या माळावर भटकतात, बागडतात. झाड्याकड्यांवर त्यांचा वावर असतो. त्यांचे जीवन खडतर असते. परंतु त्यांना या कष्टमय जीवनाची फिकीर नसते. ऊन, वारा, पाऊस झेलत ती मजेत राहतात. जणू ते आपल्या माथ्यावर सर्व आभाळ पेलतात. सिंह जंगलाचा राजा असतो. त्याचा दरारा सगळ्या रानावर असलो, म्हणून आदिवासी मुले सिंहाच्या दमदार चालीने चालत सारी संकटे झेलतात. आदिवासी मुलांच्या चिवट वृत्तीचे व धाडसाचे वर्णन कवींनी केले आहे.
प्र. ४.
अभिव्यक्ती.
'आदिवासी समाज आणि जंगल यांचे अतूट नाते असते', याविषयी
तुमचे विचार लिहा.
उत्तर:
आदिवासी लोक
गडद जंगलात आणि कठीण प्रदेशात निवास करतात. त्यांच्या घरांची बांधणी, ज्याला 'खोपटी' (झोपडी)
म्हणतात, ती झाडांच्या सुकलेल्या फांद्या आणि काटक्यांपासून
केलेली असते. ते जंगलातील फळे, कंदमुळे खाऊन आपला उदरनिर्वाह
करतात आणि नद्या-नाल्यांचे पाणी पितात. त्यांचे जीवन प्रामुख्याने खुल्या निसर्गात
व्यतीत होते, जणू काही ते आकाशाखाली आपले आयुष्य जगतात.
जंगलातील प्राणी आणि पक्षी त्यांचे मित्र असतात. आजारपणासाठी ते झाडांच्या पानांचा
आणि औषधी वनस्पतींचा उपयोग करतात. आदिवासी समाजाचे जीवन पूर्णपणे जंगलावर अवलंबून
असते, त्यामुळे त्यांचे आणि जंगलाचे नाते खूप घट्ट असते.
Iyatta 9vi Vishay Marathi Vanvasi swadhyay
9th standard Marathi digest pdf Vanvasi swadhyay
भाषा सौंदर्य
• खालील
वाक्यांत योग्य विरामचिन्हे वापरून वाक्ये पुन्हा लिहा.
(१) ते
बांधकाम कसलं आहे
(२) आकाशकंदील
पूर्ण झाल्यावर दादांनी तो खांबावरच्या खिळ्याला टांगला
(३) गुलाब
जास्वंद मोगरा ही माझी आवडती फुले आहेत
(४) अरेरे
त्याच्याबाबतीत फारच वाईट झाले
(५) आई
म्हणाली सोनम चल लवकर उशीर होत आहे
उत्तर:
1) ते बांधकाम
कसलं आहे?
2) आकाशकंदील
पूर्ण झाल्यावर दादांनी तो खांबावरच्या खिळ्याला टांगला.
3) गुलाब, जास्वंद, मोगरा ही माझी आवडती फुले आहेत.
4) अरेरे!
त्याच्याबाबतीत फारच वाईट झाले!
5) आई म्हणाली, "सोनम, चल लवकर. उशीर होत आहे."