Iyatta Dahavi Khod Aanakhi Thodese Marathi Swadhyay | खोद आणखी थोडेसे स्वाध्याय इयत्ता दहावी
Khod Aanakhi Thodese swadhyay pdf download | Swadhyay class 10 marathi | Khod Aanakhi Thodese question answer
प्र. 1) योग्य पर्याय शोधून वाक्य पूर्ण करा.
(अ) ‘खोदणे’ या शब्दाचा
कवितेतील अर्थ म्हणजे ......
(१) विहीर आणखी खोदणे.
(२) जिद्दीने आणखी प्रयत्न
करणे.
(३) घरबांधणीसाठी खोदणे.
(४) वृक्षलागवडीसाठी खोदणे.
उत्तर: जिद्दीने आणखी प्रयत्न
करणे.
(आ)गाणे असते मनी म्हणजे ............
(१) मन आनंदी असते.
(२) गाणे गाण्याची इच्छा असते.
(३) मनात नवनिर्मिती क्षमता
असते.
(४) गाणे लिहिण्याची इच्छा
असते.
उत्तर: मनात नवनिर्मिती क्षमता
असते.
प्र. (२) आकृती पूर्ण करा.
प्र. (३) कवितेतील खालील संकल्पना आणि त्यांचे अर्थ यांच्या जोड्या लावा.
कवितेतील संकल्पना |
संकल्पनेचा अर्थ |
(१) सारी खोटी नसतात नाणी |
(अ) मनातील विचार व्यक्त करावेत. |
(२) घट्ट मिटू नका ओठ |
(आ) मनातील सामर्थ्य व्यापक बनवावे. |
(३) मुठ मिटून कशाला म्हणायचे भरलेली. |
(इ) सगळे लोक फसवे नसतात. |
(४) उघडून ओंजळीत घ्यावी मनातली तळी |
(ई) भ्रामक खोट्या समजुती बाळगू नयेत. |
उत्तर:
कवितेतील संकल्पना |
संकल्पनेचा अर्थ (उत्तर) |
(१) सारी खोटी नसतात नाणी |
सगळे
लोक फसवे नसतात. |
(२) घट्ट मिटू नका ओठ |
मनातील
विचार व्यक्त करावेत.. |
(३) मुठ मिटून कशाला म्हणायचे भरलेली. |
भ्रामक
खोट्या समजुती बाळगू नयेत. |
(४) उघडून ओंजळीत घ्यावी मनातली तळी |
मनातील सामर्थ्य व्यापक बनवावे |
इयत्ता दहावी मराठी स्वाध्याय | खोद आणखी थोडेसे या धड्याचे प्रश्न उत्तर | मराठी स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता दहावी
प्र. (४) कवितेच्या आधारे खालील विधानेयोग्य की अयोग्य ते लिहा.
(१) संयमाने वागा-
उत्तर: योग्य
(२) सकारात्मक राहा-
उत्तर: योग्य
(३) उतावळे व्हा-
उत्तर: अयोग्य
(४) चांगुलपणावर विश्वास ठेवा-
उत्तर: योग्य
(५) नकारात्मक विचार करा-
उत्तर: अयोग्य
(६) खूप हुरळून जा-
उत्तर: अयोग्य
(७) संवेदनशीलता जपा-
उत्तर: योग्य
(८) जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास कायम ठेवा-
उत्तर: योग्य
(९) जुन्याच निर्मितीवर विश्वास
ठेवा-
उत्तर: अयोग्य
(१०) नवनिर्मितीवर विश्वास
ठेवा-
उत्तर: योग्य
(११) धीर सोडू नका-
उत्तर: योग्य
(१२) यशाचा विजयोत्सव करा-
उत्तर: अयोग्य
प्र. (५) काव्यसौंदर्य.
(अ) खालील ओळींचे रसग्रहण करा.
‘झरा लागेलच तिथे, खोद आणखी जरासे’
उत्तर:
'खोद आणखी थोडेसे' या कवितेमधून कवयित्रींनी संयम,
जिद्द, आत्मविश्वास व चिकाटी या गुणांच्या
मदतीने जीवनध्येय साध्य करण्याची उमेद माणसाला दिली आहे. माणसाने सकारात्मक आयुष्य
कसे जगावे, हे समजावून सांगताना वरील ओळींमध्ये 'प्रयत्नांती परमेश्वर' या उक्तीचा प्रत्यय दिला आहे.
अविरत प्रयत्न करून आदर्श जीवन जगण्याचा संदेश ही कविता देते.
कोणतेही
कार्य करताना धीर सोडू नये. खोल खोल मातीखाली निर्मळ झरा असतो. तो प्राप्त
करण्यासाठी सतत प्रयत्न करून आणखी थोडेसे खोदावे लागते. हतबल न होता, हिंमत न हारता प्रयत्नरत असावे. दुःखाच्या मातीच्या जाड थराखाली सुखाचा, आनंदाचा अक्षय झरा असतोच. म्हणून निराश न होता ओठ घट्ट मिटून खोदण्याचे
म्हणजेच सुख धुंडाळण्याचे कार्य मध्येच थांबवू नये. अंतिमतः प्रयत्नपूर्वक दुःखावर
मात करताच येते.
10th marthi Khod Aanakhi Thodese sswadhyay
Class 10 marathi Khod Aanakhi Thodese question answer
10th std marathi digest
(आ) ‘आर्त जन्मांचे असते, रित्या गळणाऱ्या पानी’, या ओळींमधील अर्थ तुमच्या
भाषेत स्पष्ट करा.
उत्तर:
कवयित्री
आसावरी काकडे यांनी 'खोद आणखी थोडेसे' या
कवितेमध्ये माणसाने प्रयत्नवादी होऊन जगण्याची उमेद धरावी, असा
उपदेश केला आहे.
कवयित्री
म्हणतात - घट्ट ओठ मिटून दुःख सोसत बसू नये. आपल्या मनात खोलवर एक गाणे लपलेले
असते,
ते शोधून काढायला हवे. हे समजावताना त्यांनी 'गळणाऱ्या
पानाचे' प्रतीक वापरले आहे.
शिशिर
ऋतूमध्ये पानगळ होते. झाड निष्पर्ण होते. परंतु जे पान सुकून, रिते होऊन झाडापासून विलग होते, त्या पानात झाडावर
असताना सोसलेल्या वेदना असतात. हे जन्माचे आर्त, आयुष्यात
सोसलेल्या वेदना, त्या सुरकुतलेल्या गळणाऱ्या पानात
सामावलेल्या असतात. म्हणून पुन्हा वसंत पालवी फुटण्याची उमेद ते बाळगून असते. गळणाऱ्या
पानामधून जीवन जगण्याची उमेद पुन्हा जागृत होते, हा आशावाद
या ओळींतून व्यक्त झाला आहे.
(इ) ‘गाणे असते गं मनी’, या ओळीतील तुम्हांला समजलेला नवनिर्मिती क्षमतेचा संदेश स्पष्ट करा.
उत्तर:
आसावरी
काकडे यांनी 'खोद आणखी थोडेसे' या कवितेमधून सकारात्मक
जीवन जगण्याची शिकवण देताना प्रत्येकाच्या मनात असलेल्या निर्मितीक्षमतेला आवाहन
केले आहे.
कवयित्रींच्या
मते - मातीखाली लपलेला झरा शोधेपर्यंत माणसाने अथक प्रयत्न करायला हवेत. धीर
एकवटून आयुष्याचा सकारात्मक शोध घ्यायला हवा. घट्ट ओठ मिटून दुःख सोसत राहू नये.
प्रत्येकाचे मन हे निर्मितीक्षम असते. त्या अंतर्मनातील गाभाऱ्याशी ज्याचे त्याचे
गाणे दडलेले असते.
मनाच्या
तळाशी असलेले हे गाणे मर्मबंधाची ठेव असते. आपल्यातच मग्न होऊन ते गाणे अनुभवणे हे
जीवनाचे सार्थक ठरते. आपल्यातल्या निर्मितीक्षमतेचा शोध आपणच घ्यायला हवा. मनात
असलेली निर्मितीक्षमता जागी करायला हवी म्हणजे मग 'आनंदाचे डोही।
आनंद तरंग ।' ही अवस्था अनुभवता येईल अशा प्रकारे
कवयित्रींनी 'गाणे असते गं मनी' या
ओळीतून माणसाला नवनिर्मिती क्षमतेचा संदेश दिला आहे.
(ई) ‘परिश्रमाशिवाय फळ मिळत
नाही’,
याबाबतीत तुम्ही घेतलेला अनुभव लिहा.
उत्तर:
मी
नववी ला असताना वार्षिक परीक्षेची तयारी करत होतो. सुरुवातीला अभ्यास करायला उशीर
झाला होता, त्यामुळे खूप भीती वाटत होती. पण मग मी ठरवले की
दररोज वेळेचे नियोजन करून मन लावून अभ्यास करायचा. प्रत्येक विषयाला ठराविक वेळ
दिला, अवघड धडे पुन्हा पुन्हा वाचले, सराव
प्रश्न सोडवले.
सुरुवातीला
खूप कष्ट वाटले, पण हळूहळू आत्मविश्वास वाढला. परीक्षेच्या वेळी मला
प्रश्नपत्रिका अवघड वाटली नाही. निकाल लागल्यावर मला चांगले गुण मिळाले. त्या वेळी
मला जाणवले की परिश्रम केल्याशिवाय यश मिळत नाही.