१३. कर्ते सुधारक कर्वे स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता दहावी | Karte Sudharak Karve question answer swadhyay

10th std marathi digest इयत्ता दहावी मराठी गाईड pdf download दहावी मराठी कर्ते सुधारक कर्वे स्वाध्याय Karte Sudharak Karve swadhyay pdf
Admin

Karte Sudharak Karve swadhyay | दहावी मराठी कर्ते सुधारक कर्वे  स्वाध्याय


प्र.(१) खालील आकृत्या पूर्ण करा.


(अ)महर्षी कर्वे यांना अपेक्षित  असलेले स्वातंत्र्य प्रकार

उत्तर:

1)   राष्ट्रीय स्वातंत्र्य

2)   संपूर्ण स्वातंत्र्य

 

10th std marathi digest इयत्ता दहावी मराठी गाईड pdf download दहावी मराठी कर्ते सुधारक कर्वे  स्वाध्याय Karte Sudharak Karve swadhyay pdf

आ) महर्षी कर्वे यांचे स्त्री स्वातंत्र्याबद्दलचे विचार

उत्तर:

1)   स्त्रियांना गुलामीतून मुक्त करायचे असेल तर देशाला संपूर्ण स्वातंत्र्य मिळाले पाहिजे.

2)   आपण गुलाम आहोत याचे स्त्रीला भान आले पाहिजे.

3)   स्त्रीने शिक्षण घेतलेच पाहिजे.

4)   शांतपणे, सोशिकपाने व सहिष्णू वृत्तीने स्त्री-शिक्षणाची चळवळ केली पाहिजे.

 

(इ) महर्षी कर्वे यांची प्रेरणास्थाने

उत्तर:

1)   पंडिता रमाबाई यांचे जीवनचरित्र

2)   ईश्वरचंद विद्यासागर यांचे जीवनकार्य

 

(ई)महर्षी कर्वे यांची स्त्रियांबाबतची स्वप्ने

उत्तर:

1)   स्त्री स्वाभिमानी बनली पाहिजे.

2)   स्त्री शिकली पाहिजे.

3)   उच्चविद्याविभूषित होऊन पुरुषांशी स्पर्धा केली पाहिजे.

4)   स्त्रीला पुरुषाइतकेच स्वातंत्र्य मिळाले पाहिजे.

 

प्र. (२) महर्षी कर्वे यांच्या कार्यकुशलतेचा ओघतक्ता तयार करा.

उत्तर:

1.    कार्यात नेमकेपणा होता.

2.    ते बोलत नसत.

3.    विचार करीत असत.

4.    विचार पक्का झाला की

5.    तो विचार आचरणात आणत.

6.    लोकांना त्यांच्या कृतीतून त्यांचा विचार समजत असे.

 

इयत्ता दहावी मराठी स्वाध्याय | कर्ते सुधारक कर्वे  या धड्याचे प्रश्न उत्तर | मराठी स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता दहावी



प्र. (३) हे केव्हा घडेल ते लिहा.

 

(अ) कर्त्या सुधारकाने सुरू केलेले कार्य पूर्णत्वास जाईल...........

उत्तर: जेव्हा पुरुषांचेही ‘शिक्षण होईल’

 

(आ) स्त्री पुरुषांशी स्पर्धा करू शकेल...........

उत्तर: जेव्हा ती उच्चविद्याविभूषित होईल.

 

प्र. (४) चौकटी पूर्ण करा.


(अ) लेखकांच्या मते दुसऱ्याच्या दु:खात दु:खी व सुखात सुखी होणारा-

उत्तर: स्थितप्रज्ञ

 

(आ) कर्वेयांना लोकमानसाने दिलेली पदवी-

उत्तर: महर्षी

 

प्र. (५) पाठाच्या आधारे वाक्यांचा उर्वरित भाग लिहून वाक्ये पूर्ण करा.


(अ) स्त्रीने स्वातंत्र्य कमवावे असे वाटणे म्हणजे-

उत्तर: स्त्रीने स्वातंत्र्य कमवावे असे वाटणे म्हणजे-खडकावर डोके आपटण्यासारखे आहे.

 

(आ) समाजाविरूद्ध विद्रोह केला तर-

उत्तर: समाजाविरूद्ध विद्रोह केला तर-विद्रोह करणार्याला समाज गिळून टाकायला येईल.

 

(इ) लोकांनी कर्वेयांची ससेहोलपट चालवली तरी-

उत्तर: कर्व्यांनी त्यांना शिव्याशाप दिले नाहीत किंवा आपल्या कार्यापासून कर्वे विचलित झाले नाहीत.

 

प्र. (६) ‘कार्य’ या शब्दासाठी पाठात आलेली विशेषणे शोधा.

उत्तर:

        मोठे, आतोनात, कठीण, ऐतिहासिक, जटिल, अटीतटीचे, महाकठीण, अलौकिक, महान इ.

 

Karte Sudharak Karve  swadhyay pdf download | Swadhyay class 10 marathi | Karte Sudharak Karve question answer


प्र. (७) खालील वाक्यांतील वाक्प्रचार शोधा.


(अ) शिक्षकांनी सांगितलेली हृद्य आठवण आमच्या मनात घर करून राहिली.

उत्तर: मनात घर करून राहणे.


(आ) वक्त्याचे विचार अनेकांच्या पचनी पडले नाहीत.

उत्तर : पचनी न पडणे


प्र. (८) खालील वाक्यांतील उभयान्वयी अव्यये शोधून लिहा.


(अ) त्याने लाडू व करंज्या खाल्ल्या.

उत्तर: व


(आ) पाऊस आला आणि गारा पडल्या.

उत्तर:  आणि


(इ) तो येणार, कारण त्याला पैशांची गरज आहे.

उत्तर : कारण


(ई) आजी म्हणाली, की मी उद्या गावाला जाणार आहे.

उत्तर: की

 

प्र. (९) केवलप्रयोगी अव्ययांचा वापर करून वाक्ये पुन्हा लिहा.

 

(अ) ..............! काय सुंदर देखावा आहे हा!

उत्तर: ओहो ! काय सुंदर देखावा आहे हा!


(आ) ..............! असा प्रसंग वैऱ्यावर देखील येऊ नये.

उत्तर: अरेरे! असा प्रसंग वैऱ्यावर देखील येऊ नये.


(इ) ..............! तुझी कल्पनाच मुळी मला पसंत नाही.

उत्तर: छे ! तुझी कल्पनाच मुळी मला पसंत नाही.


(ई) ..............! आज तू खूप चांगला खेळलास.

उत्तर: वाहव्वा ! आज तू खूप चांगला खेळलास.

 

प्र. (१०) स्वमत.

 

(अ) ‘स्त्रियांनी शिकणे अत्यंत गरजेचे आहे’, या विधानामागील अण्णांचा दृष्टिकोन स्पष्ट करा.

उत्तर:

समाजात स्त्रियांची संख्या साधारणपणे पुरुषांइतकीच असते, थोडी कमी-जास्त असू शकते. त्यामुळे स्त्रिया हा समाजाचा अर्धा भाग आहेत. दुर्दैवाने आपल्या समाजाने स्त्रियांना मागासलेले ठेवले, परिणामी अर्धा समाज मागासलेला राहिला. याचे असंख्य तोटे समाजाला आजही सहन करावे लागत आहेत. बरेचदा हे नुकसान मोजता येत नाही, आणि मोजता न आल्यामुळे आपले किती मोठे नुकसान झाले आहे हे जाणवतही नाही. स्त्रियांना मागे ठेवण्यामुळे समाजाची अर्धी बुद्धिमत्ता वाया जाते. ही बुद्धी समाजाच्या उपयोगी आली असती, पण ती दडपली जाते. पुरुषापेक्षा स्त्री अधिक सामाजिक असते. त्यामुळे पुरुष शिक्षण घेतो तेव्हा एका व्यक्तीचा विकास होतो; पण स्त्री शिक्षित झाली तर संपूर्ण कुटुंब प्रगतीच्या मार्गावर येते. म्हणून आपण हे ओळखले पाहिजे की स्त्रीला पुरुषांच्या बरोबरीचे स्थान दिलेच पाहिजे.

 

(आ) ‘जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण’ हे वचन महर्षी कर्वेयांच्या जीवनाला कसे लागू पडते, ते स्पष्ट करा.

उत्तर:

अण्णासाहेबांनी अतिशय मोठे स्वप्न पाहिले होते. ते समाजासाठी फार मोठी झेप घेऊ इच्छित होते. पण त्यांच्या या स्वप्नाला संपूर्ण समाजाची साथ मिळाली नाही. समाजाने त्यांना ओळखले नाही, उलट त्यांचा पराकोटीचा विरोध केला. त्यांचा सतत अपमान करण्यात आला, त्यांना धक्काबुक्की करण्यात आली, अगदी त्यांच्या कपड्याही फाडले गेले. हे सगळे रोजचेच झाले होते, त्यामुळे त्यांना रोज कपडे शिवण्याची वेळ येत असे. स्त्री-शिक्षणासाठी त्यांनी देणग्या गोळा केल्या, पण त्यासाठी त्यांच्यावर सतत भ्रष्टाचाराच्या धमक्या दिल्या जात. त्यांच्या चळवळीमुळे कुटुंबियांनाही मोठा त्रास सहन करावा लागला. त्यांच्यावर समाजाने बहिष्कार टाकला. हे सर्व त्यांच्या दृष्टीने फार यातनामय होते. तरीही लोककल्याणासाठी अण्णासाहेबांनी हे सर्व कष्ट आणि वेदना सहन केल्या. आज आपण त्यांच्या स्मारकांची उभारणी करतो, परंतु त्यांच्या प्रत्यक्ष जीवनात त्यांना फक्त दुःख, कष्ट आणि यातनाच भोगाव्या लागल्या. ‘जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण’ हे तुकाराम महाराजांचे वचन अण्णासाहेबांच्या जीवनाला अगदी तंतोतंत लागू पडते.

 

10th marthi Karte Sudharak Karve  swadhyay | Class 10 marathi Karte Sudharak Karve  question answer | कर्ते सुधारक कर्वे  स्वाध्याय १०वी


(इ) ‘कर्ते सुधारक कर्वे’ या पाठातून महर्षी अण्णा कर्वेयांचे तुम्हांला जाणवलेले वेगळेपण, तुमच्या शब्दांत  सांगा.

उत्तर:

अण्णासाहेब कर्वे यांचे मोठे वेगळेपण या पाठातून वाचकांसमोर स्पष्ट दिसते. अनेकदा सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींना आपल्या कार्याचा गर्व वाटतो, आणि या गर्वामुळे ते आक्रमक होतात. पण अण्णासाहेबांची प्रकृती याच्या अगदी उलट होती. त्यांना प्रचंड आत्मविश्वास होता, मात्र गर्व नव्हता. ते कधीच आक्रमक झाले नाहीत. उलट त्यांनी शांतपणे, कोणावरही न रागावता किंवा आक्रस्ताळेपणा न करता आपले कार्य सुरू ठेवले. त्यांच्या अपमानास्पद घटना घडल्या, अडथळे आले, हल्ले झाले, अगदी त्यांच्या कपड्याही फाडले गेले. तरीसुद्धा ते न डगमगता, न घाबरता, न दुःखी होत, अगदी शांतपणे सर्व सहन करत राहिले. ते स्थितप्रज्ञाप्रमाणे नव्हे तर खऱ्या अर्थाने स्थितप्रज्ञ होते. हा त्यांचा गुण आणि त्यांचे वेगळेपण मला अत्यंत भावले व आवडले.


********

Post a Comment