आंबा फळाची माहिती मराठी | Mango Fruit Information in Marathi

आंबा फळाची माहिती मराठी | Mango Fruit Information in Marathi

आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये अनेक मोठ मोठे वृक्ष आढळतात. आंबा हा वृक्ष देखील याच मोठ मोठ्या वृक्षांमध्ये आढळतो. आंब्याचे झाड हे सदाहरित असते, अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांना आंब्याचे झाड सहज ओळखता येते.

  • आंब्याच्या झाडाचे वर्णन :

सदाहरित , डेरेदार आणि सर्वांना सावली देणारे झाड म्हणजे आंब्याचे झाड होय. आंब्याच्या झाडाची पाने गडद हिरव्या रंगाची असतात. आंब्याचे झाड ३५ ते ४० फुट इतके उंच वाढते. झाडाच्या खोडाचा घेर मोठा असतो, आणि खोडाचा रंग काळपट हिरवा असतो. आंब्याच्या झाडाला भरपूर फांद्या असतात. याच्या खोडाची साल जाड असते.

आंब्याच्या झाडाला दरवर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये मोहोर म्हणजेच फुले येतात. आंब्याच्या झाडाला साधारणतः एप्रिल महिन्यात फळे येतात. कच्च्या फळांना कैरी म्हणतात, ती फळे पिकल्यानंतर आंबे तयार होतात.

Information about national fruit mango in marathi Mango Information in Marathi Esay  आंबा फळाची संपूर्ण माहिती.


Mango information in marathi pdf | Fruit Information in Marathi

  • आंब्याच्या झाडाचाआढळ : (आंब्याचे झाड कोठे आढळते?)

आंब्याचे वृक्ष भारतात सर्वत्र आढतात. आंब्याच्या फळामध्ये एक बी असते तिला  ‘कोय’ असे म्हटले जाते. ही बी लावली असतात, आंब्याचे नवीन रोप तयार होते. आंब्याचे रोप लहान असताना याची कोवळी पाने लालसर रंगाची असतात. काही आंबाच्या रोपांना कलम केले जाते. कलम केलेल्या आंब्याच्या झाडांना लवकर फळे येतात.


  • आंब्याच्या झाडाचे वैशिष्ट्य :

शिवरात्रीच्या दिवशी आंब्याच्या झाडाला येणारा मोहोर प्रथम महादेवाला वाहण्याची प्रथा आहे.

 

People Also Ask | आंबा फळाबाबत सारखे विचारले जाणारे प्रश्न :

 

१)     आंब्याच्या जाती किती आहेत?

- १३०० आंब्याच्या जातींची नोंद आहे. परंतु त्यापैकी २५ ते ३० जाती या व्यापारीदृष्ट्या महत्वाच्या आहेत.

आंबा झाडाविषयी माहिती | आंबा या फळाविषयी माहिती.

२) आंब्याच्या झाडाला फुलोरा येतो त्याला काय म्हणतात ?

- आंब्याच्या झाडाला फुलोरा येतो त्याला मोहोर असे म्हणतात.


३) भारताचे राष्ट्रीय फळ कोणते ?

   - आंबा हे भारताचे राष्ट्रीय फळ आहे.


४) आंब्याची झाडे कशी दिसतात?

- सदाहरित , डेरेदार आणि सर्वांना सावली देणारे झाड म्हणजे आंब्याचे झाड होय.


५) आंब्याचे वृक्ष कोठे आढतात?

- आंब्याचे वृक्ष भारतात सर्वत्र आढतात.


६) आंब्याच्या झाडला फळ येण्यासाठी किती वेळ / कालावधी लागतो?

- आंब्याच्या झाडाला फळ येण्यासाठी ३ ते ५ वर्षांचा कालावधी लागतो.

************

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.