२०. आपुले जगणे आपुली ओळख स्वाध्याय प्रश्न उत्तरे Pdf इयत्ता ९वी मराठी | Aapule Jagane Aapali Olakh swadhyay question answer 9th marathi

इयत्ता नववी मराठी गाईड pdf आपुले जगणे आपुली ओळख मराठी स्वाध्याय ९वी 9th standard Marathi digest pdf Aapule Jagane Aapali Olakh swadhyay 9th
Admin

Iyatta 9vi Vishay Marathi Aapule Jagane Aapali Olakh swadhyay | इयत्ता ९वी मराठी आपुले जगणे आपुली ओळख स्वाध्याय

 

 

yatta 9vi Vishay Marathi Aapule Jagane Aapali Olakh    swadhyay  Iyatta  9vi marathi Aapule Jagane Aapali Olakh   swadhyay   इयत्ता नववी मराठी स्वाध्याय आपुले जगणे आपुली ओळख         इयत्ता नववी मराठी pdf कुमारभारती

प्र.1.  खालील कोष्टक पूर्ण करा.


मानवाने करायच्या गोष्टी

मानवाने टाळायच्या गोष्टी

दिवा होऊन जगाला उजळावे

एक क्षणही कार्याविण दडवू नको.

पावित्र्याची वस्त्रे पांघरावीत

कुणाबाबतीत मनात अढी नको.

नम्र रहावे, सौम्य पाहावे.

उगाच कुणाला खिजवू नको.

दुसऱ्यासाठी करुणा असावी.

हांजी हांजी करू नको.


 

प्र. २. कारणे लिहा.

 

yatta 9vi Vishay Marathi Aapule Jagane Aapali Olakh    swadhyay  Iyatta  9vi marathi Aapule Jagane Aapali Olakh   swadhyay   इयत्ता नववी मराठी स्वाध्याय आपुले जगणे आपुली ओळख         इयत्ता नववी मराठी pdf कुमारभारती

प्र.3. खालील शब्दसमूहांचा अर्थ स्पष्ट करा.


(अ) पटकुर पसरु नको.

उत्तर:

        अंगावर पवित्रतेची वस्त्रे पांघरावीत. मंगलमय जीवन असावे. चिंध्या झालेले जीर्ण वस्त्र पांघरू नये. म्हणजे आपल्या व्यक्तिमत्वात केविलवाणेपणा व दिनवाणेपणा दुसर्यांनी आपली कीव करावी, असे वर्णन करू नये.


(आ) व्यर्थ कोरडा राहु नको.

उत्तर:

        स्वःताच्या दुःखाचे प्रदर्शन करीत रडत न राहता, हृदयात इतरांविषयी करुणा असावी. समाजातील दुःखांविषयी अंतः करणात ओलावा असावा. उगाचच कोते मन करून भावनाशून्यतेने वागू नये. म्हणजेच कोरडे राहू नये.

 

Aapule Jagane Aapali Olakh  swadhyay Iyatta 9vi marathi guide | आपुले जगणे आपुली ओळख    स्वाध्याय प्रश्न उत्तरे | इयत्ता 9vi मराठी  आपुले जगणे आपुली ओळख    स्वाध्याय


(इ) कर्तृत्वाचे घडवी वेरुळ.

उत्तर:

        पूर्वीच्या कलाकारांनी औरंगाबादजवळील डोंगरात वेरूळ येथे भव्य लेणी कोरली. पिढ्यानपिढ्या हे शिल्प कोरण्यात खर्ची पडल्या. आजमितीस वेरुळचे हे शिल्प जगप्रसिद्ध आहे. त्याप्रमाणे जीवन जगताना आपल्या कर्तबगारीचे वेरूळ घडवावे, असे कवी म्हणत आहेत.

 

प्र. ४. काव्यसौंदर्य.


(अ) 'पावित्र्याची पांधर वस्त्रे, होऊन पटकुर पसरु नको', या ओळीतील विचारसौंदर्य स्पष्ट करा.

उत्तर:

        माणसाने आपले आयुष्य कसे जगावे हे सांगताना कवी म्हणतात- श्रीमंतीचा बडेजाव दाखवणारी किमती वस्त्रे घालणे, योग्य नव्हे. म्हणजे श्रीमंतीचे प्रदर्शन करू नये. मनाची शुद्धता महत्वाची आहे. मन पवित्र हवे. मंगलतेची वस्त्रे ल्यावीत. स्वतःचे जीवन चिंध्या झालेल्या पटकुराप्रमाणे दिनवाणे, लाचार असू नये. स्वःताच्या मनाचे मलीन, घाणेरडे वस्त्र करू नये. मनाच्या पावित्र्याचा विचार या ओळींत मांडला आहे.

 

 

(आ) 'शोभेहुनही श्रेष्ठ स्वच्छता, आदिमंत्र हा विसरू नको', या ओळीत दडलेल्या अभियानाची गरज तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.

उत्तर:

        दिखाऊ प्रदर्शनापेक्षा स्वच्छता महत्वाची आहे. शोभेचा बडेजाव करणे व्यर्थ आहे. मनाची शुद्धता व परिसराची स्वच्छता असावी, हा बीजमंत्र कधी विसरू नये, अशी कवींनी या ओळींतून शिकवण दिली आहे. या ओळीत स्वच्छता अभियान दडलेले आले. स्वच्छता राखली की रोगराई होत नाही. आरोग्य  धोक्यात येत नाही. शुद्ध मोकळी हव व निर्मळ पाणी मिळते. गाडगेबाबा गावेच्या गावे झाडून स्वच्छ करीत. सेनापती बापटांनी स्वच्छतेचा वसा आपणांस दिला आहे. ‘स्वच्छता हा परमेश्वर आहे’ असे सुवचन आहे. शोभेपेक्षा स्वच्छता श्रेष्ठ आहे ‘ या मूलमंत्रात स्वच्छतेची महती कवींनी सांगितली आहे व स्वच्छता अभियानाचा पुरस्कार केला आहे.

 

प्र.५. स्वमत.
 

(अ) स्वकर्तृत्व घडवताना कवितेतील विचार कसा मार्गदर्शक ठरेल, ते सविस्तर लिहा.

उत्तर:

        स्वतःचे उत्तुंग कर्तुत्व हीच स्वःतची ओळख आहे, हे सांगताना कवींनी कवितेतून काही सुविचारांचे मार्गदर्शन केले आहे.

        दिवा होऊन जगाला प्रकाश द्यावा. चाकुसारखी धार आपल्या वागण्यात नसावी. नित्य वाचन, लेखन, मनन, व्यायाम करावा. एकही क्षण कामाशिवाय वाया दवडू नये. मन पवित्र असावे. शोभेहून स्वच्छता श्रेष्ठ हा मूलमंत्र  ध्यानी ठेवावा. नम्र असावे, उगाच अढी ठेवून कुणालाही खिजवू नये. उदात्त विचार बाळगावेत.लाचारी पत्करू नये. कुणाला छळू नये, वाद घालू नये. स्वसामर्थ्याने  संकटाचा गोवर्धन पेलावा. दुसऱ्याविषयी मनात करूणा असावी. नवनवीन विचारांचे मार्ग अंगीकारावेत. चांगल्या म उल्यांवर श्रद्धा असावी. भेदरून न जाता, धैर्याने वागावे. मातृभूमीचे व मातीचे ऋण फेडावे. अशा प्रकारे स्वकर्तृत्वाने वेरूळ उभारावे असे मार्गदर्शक विचार कवितेत मांडले आहेत.

 

(आ) आपल्या जगण्यातून आपली ओळख व्हावी, यासाठी पाळायची पथ्ये कवितेच्या आधारे लिहा.

उत्तर:

        आपण स्वतःच्या जीवनाचे निर्माते आहोत आणि आपल्या आचरणाद्वारे जगाला आपली व्यक्तिमत्व दाखवावी लागते. जीवनातील प्रत्येक क्षण कार्यपूर्ण असावा, कार्यशीलता हे महत्वपूर्ण आहे. मनात पवित्रता ठेवावी आणि नम्रता हे आपल्या स्वभावाचे भूषण असावे. इतरांना त्रास देण्याऐवजी उच्च विचार बाळगावेत. स्वच्छता हे शोभेपेक्षा महत्वाचे आहे.  वाद-विवादांपासून दूर राहून इतरांच्या प्रति करुणा बाळगावी. उच्च मुल्यांची निष्ठा ठेवून, संकटांशी लढाई करावी. धैर्य आणि हिम्मतीने जीवन जगावे. आपल्या कर्तृत्वाचे शिल्प साकार करून, मातृभूमी आणि मातीचे ऋण फेडावे.  


9th class marathi question and answer pdf download | 9th std marathi digest pdf navneet | Aapule Jagane Aapali Olakh 9th class marathi question and answer sthaulvachan



*********

Post a Comment