वीरांगना स्थूलवाचन सबइन्स्पेक्टर रेखा मिश्रा स्वाध्याय | Virangana Sthulvachan Dahavi Marathi Sub inspector Rekha Mishra Question Answers

वीरांगना स्थूलवाचन स्वाध्याय १०वी इयत्ता दहावी मराठी स्वाध्याय वीरांगना स्थूलवाचन या धड्याचे प्रश्न उत्तर Virangana Sthulvachan swadhyay pdf download
Admin

Dahavi Marathi Virangana Sthulvachan Subinspector Rekha Mishra Question Answers | वीरांगना स्थूलवाचन सबइन्स्पेक्टर रेखा मिश्रा स्वाध्याय

Virangana Sthulvachan swadhyay pdf download Virangana Sthulvachan swadhyay pdf Swadhyay class 10 marathi Virangana Sthulvachan question answer  10th marthi Virangana Sthulvachan swadhyay Class 10 marathi Virangana Sthulvachan question answer 10th std marathi digest


 (भाग - 2)

( पान नं. : ६१ आणि ६२ )


प्र. (१) खालील कृती करा.


मुद्‌द्यांवरून एक परिच्छेद तयार करा.


Swadhyay class 10 marathi Virangana Sthulvachan question answer  10th marthi Virangana Sthulvachan swadhyay Class 10 marathi Virangana Sthulvachan question answer


उत्तर:

 

सबइन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांचा जन्म उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथे झाला. त्यांनी अलाहाबाद विद्यापीठातून इंग्रजी विषयात एम.ए. ही पदवी मिळवली. पुढे त्यांनी बी.एड. ही पदवीसुद्धा घेतली. रेल्वे पोलीस बोर्डाची प्रवेश परीक्षा देऊन सबइन्स्पेक्टर या पदावर दाखल झाल्या.

श्रीमती रेखा यांनी आपल्या नोकरीकडे केवळ नोकरी म्हणून पाहिले नाही. त्यांनी आपल्या नोकरीकडे समाजकार्य म्हणून पाहिले आणि त्यांच्या कामाचे स्वरूप आमूलाग्र बदलले. विविध कारणांनी घराला दुरावलेल्या, भरकटलेल्या,चुकीच्या मार्गाला लागलेल्या, अवैध कामांना जुपलेल्या मुलांची सोडवणूक करण्याकडे लक्ष केंद्रित केले. अवघ्या दीड वर्षांत त्यांनी ४३४ मुलांची सोडवणूक केली. हे फार मोठे सामाजिक कार्य त्यांनी पार पाडले.

 

प्र. () पाठाच्याआधारे टिपा लिहा.


वीरांगना स्थूलवाचन स्वाध्याय १०वी इयत्ता दहावी मराठी स्वाध्याय वीरांगना स्थूलवाचन या धड्याचे प्रश्न उत्तर मराठी स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता दहावी

उत्तर:

 

अ) मुले भरकटण्याची कारणे

उत्तर:

काही मुले वेगवेगळ्या कारणांनी आईवडिलांशी भांडतात आणि रागाच्या भरात घर सोडून निघून जातात. मुंबईसारखे शहर व सिनेमा यांच्यातील झगमगत्या दुनियेला भुलून काही मुले घरातून पळ काढतात. गरिबीला कंटाळून चार पैसे मिळवण्यासाठी शहराकडे धाव घेणारी मुलेही असतात. कधी कधी काही समाजकंटक मुलांना पळवून नेतात आणि त्यांना अवैध कामांना जुंपतात. अशा अनेक कारणांनी मुले स्वतःच्या घराला मुकतात.

 

आ) रेखाजींच्या कार्याचा परिणाम

उत्तर:

श्रीमती रेखा यांनी आपल्या नोकरीकडे एक सामाजिक कार्य या दृष्टीने पाहिले. या उदात्त दृष्टिकोनामुळे भरकटलेल्या मुलांकडे लक्ष गेले. वेगवेगळ्या कारणांनी मुले घराला दुरावतात. मुलांना वस्तुस्थिती कळत नाही. स्वतःला काय हवे एवढेच त्यांना कळते. यातून गैरसमज, ताणतणाव निर्माण होतात. भांडणे होतात. मुले रागावून घर सोडून निघून जातात.

 

वीरांगना स्थूलवाचन स्वाध्याय १०वी | इयत्ता दहावी मराठी स्वाध्याय | वीरांगना स्थूलवाचन या धड्याचे प्रश्न उत्तर


प्र. (३) ‘प्रेम आणि आपुलकी’ या गोष्टींमुळे भरकटलेली मुले पुन्हा स्वगृही जाण्यास तयार होतात, हे पाठाच्या आधारे  स्पष्ट करा.

उत्तर:

चुका करणाऱ्या माणसांकडे व मुलांकडे समाज, पोलीस नकारात्मक दृष्टीने पाहतात. पोलीससुद्धा अशी मुले समोर आली की, त्यांच्याकडून माहिती मिळवण्यासाठी पहिल्यांदा त्यांना मारपीट करतात. ही मुले लबाडच असतात, गुन्हेगारी स्वरूपाचीच असतात असा पोलिसांनी पूर्वग्रह करून घेतलेला असतो. साहजिकच, एक तर मुले पोलिसांना घाबरतात किंवा कोडगी बनतात. या मुलांचा सुधारण्याचा मार्गच बंद होतो.

श्रीमती रेखा यांनी मात्र आईच्या मायेने अशा मुलांकडे पाहिले. त्यांना जवळ घेतले. आपलेसे केले. त्यामुळे ही मुले पुन्हा घरी जाण्यास राजी झाली. चांगले आयुष्य सुरू करण्याची त्यांना संधी मिळाली. पहिल्याच केसमध्ये त्यांना सापडलेल्या १४ वर्षांच्या मुलाचे त्यांनी ममतेने मन परिवर्तन केले. पोलिसी बडगा दाखवण्यापेक्षा त्यांनी त्यांच्याशी मैत्री केली. यामुळे ही मुले रेखारजीच्या जवळ आली. याचा अर्थच असा की मुलांशी प्रेमाने वागले तर ती स्वगृही जाण्यास तयार होतात.

 

प्र. (४) ‘भरकटलेल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी रेखाजींनी केलेले प्रयत्न प्रशंसनीय आहेत’, हे पाठाच्या आधारे स्पष्ट करा.

उत्तर:

रेखाजींचे कार्य हे राष्ट्र घडवण्याचेच कार्य आहे. अलीकडे समाजमाध्यमांचा प्रभाव खूप वाढला आहे. त्याचे विपरीत परिणाम दिसून येतात. फेसबुकवरील गप्पांमधून अनेक समाजकंटक व्यक्ती अजाण मुलांना/मुर्लीना फसवतात. अशा प्रकरणांमध्ये मुलांना समजावून सांगणे खूप कठीण असते. कारण या वयात मुलांच्या भावना सैरभैर झालेल्या असतात.

अशा वेळी रेखाजी त्यांना प्रेमाने समजावून सांगतात, कायद्याची भीती घालतात, पुढील आयुष्यातील भीषण परिस्थितीची जाणीव करून देतात आणि मुलांना चुकीच्या मार्गापासून दूर करण्याचा प्रयत्न करतात. रेखाजींच्या कुशल प्रयत्नांमुळे अनेक मुले गैरप्रवृत्तीला बळी न पडता पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात सामील व्हायला तयार होतात.

हे खरे तर आपल्या समाजाचे, आपल्या राष्ट्राचे फार मोठे भाग्य आहे. एक प्रकारे देशाचे भवितव्य घडवण्याचे हे कार्य आहे. आपला समाज रेखाजींच्या या कार्यामुळे नेहमीच त्यांचा कृतज्ञ राहील.


Virangana Sthulvachan swadhyay pdf | nSwadhyay class 10 marathi

Virangana Sthulvachan question answer  | 10th marthi Virangana Sthulvachan swadhyay


प्र. (५) सबइन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांच्या कार्याची माहिती वाचून तुमच्या मनात येणारे विचार स्पष्ट करा.

उत्तर:

मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या शहरात आता या घडीला हलाखीचे जीवन जगणारी, घराला दुरावलेली किंवा अनाथ अशी हजारो बालके आहेत. त्यांना समाजकंटक भीक मागायला लावतात किंवा अमली पदार्थाच्या तस्करीसाठी त्यांचा उपयोग करून घेतात. अन्य अवैध कामांसाठी सुद्धा बालकांचा निष्ठूरपणे उपयोग केला जातो.

जरी हे काम अत्यंत त्रासदायक व किचकट काम. अशा कामासाठी लहान मुलांना अल्प मोबदल्यात बेकायदेशीर रितीने जुंपले जाते. अत्यंत कष्टाच्या कामांसाठीसुद्धा मुले वापरली जातात. चोऱ्या करण्यासाठी तर मुलांचा वापर करणाऱ्या टोळ्याच अस्तित्वात आहेत. अशा कर्दमातून मुलांची सुटका करणारा एक तरी सहृदय माणूस असायला हवा होता. सबइन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांच्या रूपाने एक आशेचा किरण निर्माण झाला आहे.


*******

महत्वाचे
वीरांगना (स्थूलवाचन) या पाठाखालील भाषाअभ्यास पान नं. ६३ वरील प्रश्न उत्तरे पुढील भागात देण्यात आली आहेत. पुढील उत्तरे पाहण्यासाठी खालील view बटनावर क्लिक करा.

View

Post a Comment