अपठि त गद्य आकलन प्रश्न उत्तरे दहावी मराठी | Apathit Gadya Aakalan Prashn Uttare

अपठि त गद्य आकलन प्रश्न उत्तरे दहावी मराठी | Apathit Gadya Aakalan Prashn Uttare
Admin

 

अपठि त गद्य आकलन प्रश्न उत्तरे दहावी मराठी पान नं : ४४ 

अपठि त गद्य आकलन प्रश्न उत्तरे दहावी मराठी | Apathit Gadya Aakalan Prashn Uttare


उतारा


वर्षाऋतूचा काळ आहे. आभाळ ढगांनी व्याप्त आहे. दिशा पाणावलेल्या आहेत. अधूनमधून पावसाच्या सरी कोसळताहेत. वृक्ष-पर्णांनी अंग धरले आहे. करंगळीची सोंड झाली आहे. उसळत घुसळत नवे पाणी फेसाळत चालले आहे. कुठे काठाला भिडले आहेकुठे काठावर चढले आहेकुठे संथ-गंभीर राहून दबदबा दाखवत आहे. भव्यस्तब्ध पुलाच्या कमानीखालून जाणारे पाणी समजूतदार वाटतेशहाण्यासारखे वागतेपण तेच पुढे जाऊन काठावरची  गरीब बिचारी खोपटी उद्ध्वस्त करून आपल्याबरोबर घेऊन जाताना क्रूरअडाणी आणि उद्दाम वाटते. पुढे जाता जाता कुठे झाडावर चढतेकुठे गच्चीवर लोळतेकुठे घाट बुडवते तर कुठे वाट तुडवते. पाणी येते आणि जाते. एवढे उदंड येणारे पाणी लांब समुद्राच्या पोटात गुडुप्प होते. पाणी किती शहाणे असते! जोवर कोणी अडवत नाहीशेतमळेबागा फुलवत नाहीरान-रान हसवत नाही तोवर पाण्याने तरी काय करावेदरवर्षी वर्षाऋतूत यावे अन्वाहून जावे. पाण्याला जाता जाता कृतार्थ होऊन जावेफुलवत-खुलवतपिकवत जावे असे वाटल्याशिवाय का राहत असेलपण पाण्याचे मन कोण जाणणार?

- राजा मंगळवेढेकर


प्र.(अ) उतारा वाचून दिलेल्या कृती करा.


(१) खालील भाव व्यक्त करणारे वाक्य उताऱ्यातून शोधून लिहा.


(अ) वृक्ष बहरू लागले आहेत. ....................

उत्तर: वृक्ष बहरू लागले आहेत वृक्ष –पर्णांनी अंग धरले आहे.


(आ) नदी, नाल्यात भरपूर पाणी आहे. ....................

उत्तर: नदी, नाल्यात भरपूर पाणी आहे करंगळीची सोंड झाली आहे.

 

प्र. (२) स्पष्ट करा.


(अ) पाणी समजूतदार वाटते ....................

उत्तर:

        पाणी शांतपणे वाहते, तेव्हा ते जणू काही कोणतेही नुकसान होऊ नये, याची काळजीच घेत असावे असा भास होतो. म्हणून ते त्या वेळी समजूतदार वाटते.


(आ) पाणी क्रूर वाटते ....................

उत्तर:

        नदीकाठावरच्या गरिबांच्या झोपड्या उध्वस्त करणाऱ्या पुराच्या पाण्याला पाहिल्यावर त्याच्या मनात त्या गरीब, दुबळ्या माणसांबद्दल कणवच नसावी, अशी भावना मनात जागी होते आणि ते पाणी स्वभावाने क्रूर असावे असे वाटते,

  

प्र. (आ) खालील आकृत्या पूर्ण करा.

 

(१) वर्षाऋतूतील निसर्गाचे रूप

उत्तर:

1)   आकाश ढगांनी पूर्णपणे झाकून गेलेले असते.

2)   संपूर्ण अवकाश पाणावलेला असतो.

3)   अधूनमधून पाऊस कोसळत असतो.

4)   सगळीकडे हिरवीगार वनराजी पसरलेली असते.

5)   नदी नाल्यातून पाणी ओसंडून वाहत असते.

 

2) पुढे वाहता वाहता पाण्याकडून होणाऱ्या विविध क्रिया

उत्तर:

1)   उसळत, घुसळत,फेसाळत

2)   काठ ओलांडून ओसंडून वाहणे.

3)   संथपणे, धीरगंभीरपणे वाहणे.

4)   बेफाम होऊन सगळे बुडवत धावणे.

 

प्र. (इ) तक्ता पूर्ण करा. 


खालील वाक्यांतील अव्यये ओळखा व त्यांचा प्रकार लिहा.

वाक्य

अव्यय

अव्ययाचा प्रकार

(१) पाणी कुठे गच्चीवर लोळते.

कुठे , वर

क्रियाविशेषण व, शब्दयोगी अव्यये

(२) पाणी येते आणि जाते

आणि

उभयान्वयी अव्यय

 


प्र. उताऱ्यातून कळलेला ‘पाण्याचा स्वभाव’ तुमच्या शब्दांत लिहा.

उत्तर:

पावसाळा आला की सर्वत्र पाण्याचे साम्राज्य पसरलेले दिसते. जिकडे पाहावे तिकडे पाणीच पाणी! अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे नदीनाले भरून वाहू लागतात. कधी ते काठाला धडकतं, तर कधी काठावर चढतं, आणि त्याच्या या धसमुसळ्या प्रवाहातून त्याची ताकद जाणवते. काही ठिकाणी मात्र ते इतके संथपणे वाहते की जणू आपली ताकद शांतपणे दाखवत असल्याचा भास होतो.

मोठ्या पुलांखालून वाहताना ते एखाद्या शहाण्या, समजूतदार मुलासारखे वाटते. पण कधी कधी तेच पाणी उग्र रूप धारण करून  काठावरच्या गरिबांच्या झोपड्या वाहून नेताना त्याचा क्रूर स्वभाव स्पष्ट दिसतो. तर कधी ते झाडांवर चढते, गच्चीवर लोळते, घाटांना गिळून टाकते आणि वाटा तुडवते. त्यावेळी त्याचा अवखळ, बेफाम स्वभाव उलगडतो.

अशा प्रकारे पाण्याच्या स्वभावाचे अनेक वेगवेगळे पैलू या वर्णनातून उलगडून दिसतात.

 

प्र. वर्षाऋतूतील पाणी निष्फळ वाहून जाऊ नये म्हणून माणसाने काय काय करायला हवे, याबाबत तुमचे विचार लिहा.

उत्तर:

वर्षाऋतूत भरपूर पाऊस पडतो आणि नद्या-नाले ओसंडून वाहतात. इतके पाणी वाहून जाऊन वाया जाते. हे पाणी आपण योग्य प्रकारे साठवले, तर वर्षभर त्याचा उपयोग होऊ शकतो. माझ्या मते माणसाने पुढील गोष्टी केल्या पाहिजेत:

1.          पाण्याचे साठवण (जलसंधारण):
      गावोगावी तलाव, बांध, चेकडॅम आणि बंधारे बांधून पाणी साठवावे. त्यामुळे पाणी जमिनीत मुरून विहिरी व बोअरवेलला पाणी मिळते.

2.     पावसाचे पाणी साठवणे (रेनवॉटर हार्वेस्टिंग):
     घरांच्या छतावरून पडणारे पाणी टाक्यांमध्ये साठवावे. हे पाणी पिण्यास, स्वयंपाकासाठी व इतर कामांसाठी वापरता येते.

3.     झाडे लावणे:
     झाडे लावल्याने मातीची धूप कमी होते व पाणी जमिनीत जास्त प्रमाणात मुरते. त्यामुळे भूजलसाठा वाढतो.

4.     पाण्याचा काटकसरीने वापर:
     वर्षभर पाणी कमी पडू नये म्हणून पावसाळ्यातच नव्हे तर नेहमी पाणी वाचवावे. नळ वाहू देऊ नयेत व पाण्याचा अपव्यय टाळावा.

5.     शेतात मृदसंधारण करणे:
        शेतात आडवे बांध घालणे, गवत व झाडांची लागवड करणे यामुळे पाणी धरून ठेवता येते.

थोडक्यात, वर्षाऋतूत आलेले पाणी जर आपण साठवून योग्य पद्धतीने वापरले, तर वर्षभर पाणीटंचाई टाळता येईल आणि शेती, पिण्याचे पाणी तसेच पर्यावरण यांचा समतोल राखता येईल.

*********

 

Post a Comment