माकड प्राण्याची माहिती | Monkey information in marathi

14] Information about Monkey in Marathi | माकड संपूर्ण माहिती


मराठी नाव : माकड

हिंदी नाव : बंदर

इंग्रजी नाव : MONKEY

 

माकड माहिती मराठी  Makad vishay mahiti  Makad mahiti marathi  Monkey information in marathi for student  Monkey information for school project  Monkey information in marathi

                माकड हा प्राणी लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सर्वांना परिचित आहे. माकड झाडावर राहते.


माकड प्राण्याचे वर्णन :

    माकडाला चार पाय असतात; परंतु पुढच्या पायांचा हातासारखा उपयोग करतो. 'माकड' चालताना चारही पाय वापरतो. त्याला एक लांब शेपटी, दोन कान असतात. माकडाची शरीररचना जवळ जवळ माणसासारखी असते.


माकड प्राण्याचे अन्न  

            झाडांची कोवळी पाने, फुले, फळे, भुईमुगाच्या शेंगा, चुरमुरे वगैरे माकडाचे अन्न होय. तसेच माकडाला ओले खोबरे खूप आवडते. काही माकडे मांसाहारी पण असतात. माकडाचा रंग तांबूस तसेच काळा असतो. त्याच्या अंगावर सोनेरी केस असतात.


माकड प्राण्याची इतर  माहिती :

    माकडाच्या शरीरापेक्षा शेपटी अधिक लांब असते. माणूस आणि माकड यांत खूप साम्य आहे. माकड हा माणसाचा मूळ पूर्वज आहे. माकडाची उत्क्रांती होत होतच माकडाचा मानव झाला. माकड प्राणी माणसाळला की माणसे त्याचा वापर आपल्या उपजीविकेसाठी करतात.

 ✒ ✒ ✒ ✒ ✒ ✒ ✒

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.