भारतीय कलांचा इतिहास स्वाध्याय प्रश्न उत्तरे | Class 10 History exercise Marathi PDF- Maharashtra Board
१. (अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने
पूर्ण करा.
(१) चित्रकला आणि शिल्पकला यांचा ........... मध्ये समावेश
होतो.
(अ) दृक्कला (ब) ललित कला
(ब) लोककला (क) अभिजात कला
उत्तर: चित्र कला
आणि शि ल्पकला यांचा दृक्कला मध्ये समावेश होतो.
(२) मथुरा शिल्पशैली .......... काळात उदयाला आली.
(अ) कुशाण (ब) गुप्त
(क) राष्ट्रकूट (ड) मौर्य
उत्तर: मथुरा शिल्पशैली
कुशाण काळात उदयाला आली.
Std 10 History Chapter 4 Swadhyay | दहावी इतिहास पाठ 4 स्वाध्याय | History Guide class 10 pdf
(ब) पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.
(१) कुतुबमिनार - मेहरौली
(२) गोलघुमट - वि जापूर
(३) छत्रपती शि वाजी महाराज रेल्वे टर्मि नस - दिल्ली
(४) ताजमहाल – आग्रा
उत्तर: छत्रपती
शि वाजी महाराज रेल्वे टर्मिनस - दिल्ली
२. टीपा लिहा.
(१) कला
उत्तर:
1) स्वतःला आलेले
अनुभव आणि त्यातून प्राप्त झालेले ज्ञान तसेच मनातील भावभावना इतरांपर्यंत पोचवाव्या, ही प्रत्येक
व्यक्तीची सहजप्रवृत्ती असते. या सहजप्रवृत्तीच्या प्रेरणेतून जेव्हा एखादी
सौंदर्यपूर्ण निर्मिती केली जाते, तेव्हा त्या निर्मितीला कला असे म्हणतात.
2) कल्पकता, संवेदनशीलता, भावनाशीलता आणि कौशल्य हे अत्यंत महत्त्वाचे घटक कलानिर्मितीच्या
मुळाशी कलाकाराचे असतात.
3) 'दृक्कला' आणि 'ललित कला' अशी
कलाप्रकारांची विभागणी केली जाते.
4) कलेच्या 'लोककला' आणि 'अभिजात कला' अशा दोन परंपरा मानल्या जातात.
5) कलानिर्मितीची प्रत्येक कलाकाराची स्वतंत्र पद्धत
म्हणजे शैली असते. एखादी पद्धत जेव्हा परंपरेचे स्वरूप धारण करते तेव्हा ती पद्धत
विशिष्ट कलाशैली म्हणून ओळखली जाऊ लागते.
(२) हेमाडपंती शैली
उत्तर:
1) महाराष्ट्रातील
बाराव्या-तेराव्या शतकातील मंदिरांना 'हेमाडपंती' मंदिरे असे म्हणतात.
2) हेमाडपंती
मंदिराच्या बाह्य भिंती बऱ्याचदा तारकाकृती असतात.
3) तारकाकृती
मंदिराच्या बांधणीत मंदिराची बाह्य भिंत अनेक कोनांमध्ये विभागली जाते. त्यामुळे
त्या भिंती आणि त्यावरील शिल्पे यांच्यावर छायाप्रकाशाचा सुंदर परिणाम पाहण्यास
मिळतो.
4) हेमाडपंती
मंदिरांचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे भिंतीचे दगड सांधण्यासाठी चुना वापरलेला
नसतो. दगडांमध्येच एकमेकांत घट्ट बसतील अशा कातलेल्या खोबणी आणि कुसू यांच्या
आधाराने भिंत उभारली जाते. मुं
4) बईजवळील
अंबरनाथ येथील अंब्रेश्वर, नाशिकजवळचे सिन्नर येथील
गोंदेश्वर, हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ ही हेमाडपंती मंदिराची उत्तम उदाहरणे
आहेत.
५) त्यांची
बांधणी तारकाकृती प्रकारची आहे.
इयत्ता दहावी इतिहास प्रश्नोत्तर PDF | Maharashtra Board Class 10 History Notes Download. | Bhartiy Kalancha Itihas swadhyay PDF Class 10
(३) मराठा चित्र शैली
उत्तर:
1) इसवी सनाच्या सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात
मराठा चित्रशैली विकसित होण्यास सुरुवात झाली.
2) या शैलीतील
चित्रे रंगीत असून ती भित्तिचित्र आणि हस्तलिखितांमधील लघुचित्रांच्या स्वरूपातील
आहेत.
3) वाई, मेणवली, सातारा यांसारख्या ठिकाणी जुन्या वाड्यांमधून
मराठा चित्रशैलीतील काही भित्तिचित्रे पाहण्यास मिळतात.
4) मराठा
चित्रशैलीवर राजपूत चित्रशैलीचा आणि युरोपीय चित्रशैलीचा प्रभाव पडलेला दिसतो.
३. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
(१) कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते.
उत्तर:
1) कलावस्तूंच्या
खरेदी-विक्रीचे एक स्वतंत्रजग आहे.
2)तिथे
कलावस्तूंचे मूल्य ठरवण्यासाठी ती कलावस्तू नकली नाही ना, हे पारखण्याची आवश्यकता असते.
3)त्यासाठी
कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते.
(२) चित्रकथीसारख्या नामशेष होणाऱ्या मार्गावर असलेल्या परंपरेचे पुनरुज्जीवन करणे गरजेचे आहे.
उत्तर:
1) कठपुतळ्या
किंवा चित्रांच्या सहाय्याने रामायण-महाभारत सांगण्याच्या परंपरेला ‘चित्रकथी’
परंपरा असे म्हणतात.
2)
ठाकूर, आदिवासी, वारली अशा जमातींनी चित्रकथी परंपरा पिढ्यानपिढ्या टिकवून ठेवली आहे.
3)
चित्रकथी कुटुंबामध्ये जतन करून ठेवलेल्या पोथ्या आता जीर्ण झाल्या आहेत. नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या चित्रकथी सारख्या
या परंपरांचे पुनरुज्जीवन करणे गरजेचे आहे, कारण या परंपरा आपल्या सांस्कृतिक घटक असून
तो आपला वैभवशाली वारसा आहे.
SSC Board Bhartiy Kalancha Itihas Study Material | इयत्ता दहावी इतिहास प्रश्नोत्तर PDF | दहावी भारतीय कलांचा इतिहास प्रश्नोत्तर
४. पुढील तक्ता पूर्ण करा.
मंदिर
स्थापत्य |
नागर |
द्राविड |
हेमाडपंती |
वेशिष्टे |
1) पायापासून
क्रमशः लहान होत जाणाऱ्या शिखरांच्या प्रतिकृती वरपर्यत रचलेल्या असतात. टोकापर्यंत सलग असते. |
1) मंदिरांची शिखरे
पिरॅमिडच्या आकाराची असतात. 2) शिखरांपेक्षा गोपुरे
मोठी व भव्य असून त्यावर पौराणिक कथाचित्रे कोरलेली असतात. |
1) या शेलीतील मंदिरांची
बांधणी 2) मंदिरांच्या बांधणीत
चुना व मातीचा वापर केलेला नसतो. |
५. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.
(१) लोकचित्रकला शैलीविषयी सविस्तर माहिती लिहा.
उत्तर:
अश्मयुगीन काळापासून गुहाचित्रांची परंपरा
चालू आहे. या गुहाचित्रांतून
लोकचित्रशैलौचे
जतन केले गेले.
1) गुहाचित्रांमध्ये प्राणी, मनुष्याकृती, झाडे, शिकारीचे प्रसंग अशी चित्रे गुहांच्या भिंतींवर
कोरलेली आढळतात.
2) अश्मयुगीन मानवाच्या प्रगतीच्या वाटचालीत चित्रांचे विषय बदलत गेले. नवीन
प्राणी, शेतीजीवन, वनस्पती इत्यादी
नवीन विषयांचा उदय झाला.
3) मनुष्याकृतींच्या रेखाटनांच्या पद्धतीत व चित्रांमध्ये वापरल्या गेलेल्या
रंगांमध्ये
फरक
होत गेला.
4) चित्रांसाठी नैसर्गिक द्रव्यांपामून, वनस्पतींच्या पानांपासून
तयार केलेले विविध रंग वापरले गेलेले दिसतात. सभोवतालचा परिसर आणि अवगत झालेले नवनवीन
ज्ञान व तंत्रज्ञान यांचा वापर करून मानव चित्रे कोरु लागला.
5) नवाश्मयुगात विकसित झालेला मानव देव-देवतांची चित्रे काढू लागला.
6) सणसमारंभ
प्रसंगी घरांच्या भितींवर चित्रे काढणे, अंगणात रांगोळी काढणे
अशा स्थानिक परंपरांतून लोकचित्रशैली विकसित झाली.
7) वाटली चित्र परंपरा, चित्रकथी परंपरा, लघुचित्र परंपरा अशा अनेक लोकचित्रकला शैली आढळतात.
(२) भारतातील मुस्लीम स्थापत्यशैलीची वैशिष्ट्ये सोदाहरण स्पष्ट करा.
उत्तर:
मध्ययुगीन
भारतात मुस्लीम सत्तांच्या काळात विकसित झालेल्या या मुस्लीम
स्थापत्यशैलीची
वैशिष्ट्ये व उदाहरणे पुढीलप्रमाणे
(1) या
स्थापत्यशैलीत बांधलेला कुतुबमिनार जगातील सर्वाधिक उंच (240 फूट) आहे.
(2) मुघल
सम्राट शहाजहानने बांधलेला ताजमहाल ही वास्तू जगातील आठवे आश्चर्य मानले जाते.
(3) इसवी
सनाच्या सतराव्या शतकात बांधलेला विजापूरचा गोलघुमट ही वास्तू प्रतिध्वनीसाठी
प्रसिद्ध आहे.
4) फतेहूपुर
येथे सम्राट अकबराने बांधलेला राजवाडा आणि बुलंद दरवाजा त्याच्या उंचीसाठी आणि
भव्यतेसाठी प्रसिद्ध आहे.
(5) दिल्ली
आणि आग्रा येथे बांधलेले लाल किल्ले विस्तिर्ण आणि देखणे आहेत. वरील सर्व वास्तू मुस्लीम
स्थापत्यशैलीचे उत्तम नमुने आहेत.
(३) कला क्षेत्रात व्यवसायाच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत हे स्पष्ट करा.
उत्तर:
कलाक्षेत्रांत व्यवसायाच्या पुढील संधी
उपलब्ध असतात:
1) कलेच्या अभ्यासकांना संग्रहालये, अभिलेखागारे,
ग्रंथालये, पुरातत्त्वीय संशोधन आणि भारतीय
विद्या या ठिकाणी व्यवसाय मिळू शकतात.
2) कलांचे अभ्यासक पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करु शकतात.
3) औदयोगिक आणि जाहिरात क्षेत्रात तसेच कलावस्तूंच्या खरेदी-विक्री व्यवसायात
कलांच्या जाणकारांची आवश्यकता असते.
4) चित्रपट आणि नाटक निर्मितीसाठी नेपथ्य, कलाकार,
दिग्दर्शक, छायाचित्रकार प्रकाशयोजना कटणारे
इत्यादी कलाकारांची आवश्यकता असते.
5) मुद्रणक्षेत्रात तसेच घरसजावटीच्या साहित्यनिर्मितीत कला क्षेत्रातील जाणकारांची
आवश्यकता असते.
6) दागदागिने, धातूंच्या वा लाकडी शोभेच्या वस्तू बनवणे,
बांबू, काच, कापड,
माती, दगडी कलापूर्ण वस्तू, शिल्पे बनवणे या
क्षेत्रांतही व्यवसायाच्या संधी उपलब्ध असतात.
Class 10 History Marathi Maharashtra Board | इयत्ता दहावी इतिहास प्रश्नोत्तर PDF | Maharashtra Board Class 10 History Notes Download.
**********
महत्वाचे
PDF फाईल डाउनलोड करण्यासाठी खालीन बटण वर क्लिक करा, आणि टाईमर पूर्ण होईपर्यंत थांबा.
PDF फाईल डाउनलोड करण्यासाठी खालीन बटण वर क्लिक करा, आणि टाईमर पूर्ण होईपर्यंत थांबा.