हत्ती प्राण्याची माहिती | Elephant information in marathi

9] Information about Elephant in Marathi | हत्ती संपूर्ण माहिती


मराठी नाव : हत्ती

हिंदी नाव : हाथी

इंग्रजी नाव : ELEPHANT

 

हत्ती माहिती मराठी  Hatti vishay mahiti  Hatti mahiti marathi  Elephant information in marathi for student  Elephant information for school project  Elephant information in marathi


                हत्ती हा जंगलात राहणारा प्राणी आहे. हा जंगली प्राणी अवाढव्य व बुद्धिमान असतो.


हत्ती प्राण्याचे वर्णन : 

            हत्ती जंगलातील सगळ्या प्राण्यांपेक्षा वेगळा आहे. त्याला दोन मोठे कान, दोन बारीक डोळे, एक आखूड शेपटी, एक मोठी सोंड आणि धारदार सुळे असतात.


हत्ती प्राण्याचे अन्न : 

            जंगली हत्ती गवत, झाडाची पाने, वेळूचे अंकुर खातात, तर पाळीव हत्ती कणकेचे रोट, गवत, चारा, झाडाची पाने, ऊस, केळी, नारळ, फळे इ. खातात. हा पूर्णपणे शाकाहारी प्राणी आहे.


हत्ती प्राण्याची इतर माहिती : 

            हत्ती आपल्या सोंडेने लाकडाचे जड ओंडके उचलून नेऊन दुसऱ्या ठिकाणी वाहून नेवू शकतो, झाडाच्या फांद्या कडाकड मोडू शकतो. त्याची सोंड इतकी बळकट आणि मजबूत असते, की त्या सोंडेने हत्ती माणसालाही उचलू शकतो.

            पूर्वी हत्ती राजे-रजवाड्यांत पाळले जात. हत्तीच्या प्रचंड शक्तीमुळेच त्याचा पूर्वी युद्धात वापर केला जात असे. हत्तीवरून सैर करणे, शिकार करणे, हत्ती पाळणे, हत्ती झुंजवणे हा राजे-रजवाड्यांचा शौक होता.

    हत्तीला पाण्यात डुंबायला, एकमेकांच्या अंगावर पाण्याचे फवारे उडवायला आवडते, नदी, सरोवरे, तलाव या जागा हत्तीला फार प्रिय आहेत, हत्ती कळपात राहतो. हत्तींच्या कळपाचे नेतृत्व मात्र चाणाक्ष व चतुर हत्तीण करत असते, शत्रूची चाहूल लागताच हत्तीण लगेच चीत्कार करून साथीदारांना सावध करते.

हत्ती हा कृतज्ञ प्राणी आहे. त्याला माया-ममतेने वागवणाऱ्या व्यक्तीवर तो जिवापाड प्रेम करतो, स्वामिनिष्ठा हा त्याचा विशेष गुण आहे. असा मंद चालीचा, बलवान व बुद्धिमान प्राणी मृत्यूनंतरही उपयोगी पडतो. हत्तीचे दात म्हणजेच हस्तिदंतापासून अनेक मौल्यवान व शोभेच्या वस्तू तयार करतात, त्याला बाजारात भरपूर प्रमाणात मागणी असते. नवरात्रात मुली पाटावर हत्तीचे चित्र काढून ते मध्यभागी ठेवून फेर धरतात व गाणी म्हणतात. याला 'हादगा' म्हणतात. भारतात हा प्राणी आसाम, बंगाल, उत्तर प्रदेश, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू इत्यादी राज्यांत आढळतो.

Hatti mahiti marathi | Elephant information in marathi for student | Elephant information for school project

✒ ✒ ✒ ✒ ✒ ✒ ✒ ✒

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.